Home Breaking News जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पोस्टाने पाठविल्या राख्या

जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पोस्टाने पाठविल्या राख्या

853
  • महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना वरोरा चा उपक्रम

वरोरा
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना तालुका शाखा वरोरा च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या ओपीएस राखी(जुनी पेंशन योजना) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
पंचायत समिती सभागृह वरोरा येथे तालुका संघटनेच्या महिला प्रतिनिधी एकत्रित येत त्यांनी ओपीएस राख्यांची निर्मिती केली .या राख्यांवर जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी यासाठी ” एकच मिशन जुने पेन्शन “असे नमूद केले आहे. महिला शिक्षकांनी तयार केलेल्या सर्व राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना पोस्टाने पाठविण्यात आल्या. राखीसोबत जुनी पेन्शन लागू करावी यासाठी एक भावनिक साद घालणारे पत्र देखील प्रत्येक महिला भगिनींनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठविले.ज्या भगिनी या उपक्रमात सहभागी होऊ शकल्या नाही त्या सर्वांनी आपापल्या परीने राखी तयार करून मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आवाहन जुनी पेंशन संघटना वरोरा तर्फे आवाहन केले आहे.
यावेळी प्रियंका तितरे, प्रतिभा वाकडे, अर्चना घुटके, निरांजली कुंभारे, वनिता धुडसे, स्वाती खराबे, श्वेता लांडे, दिप्ती चौखे, सुचीता कुळे, पूजा कुंटेवार, स्नेहल खिरटकर, सपना बोम्मावर, मनीषा नन्नावरे, जया पुनवटकर, माया ढेंगळे , आशा गोवारदिपे, अर्चना पिंपळशेंडे, वनकर व नंदा चौधरी या पेंशन फायटर उपस्थित होत्या.

error: Content is protected !!