Home सामाजिक संत भोजाजी महाराज शेतकरी गटाच्या पुढाकाराणे तलाठी कार्यालयाचे उदघाटन

संत भोजाजी महाराज शेतकरी गटाच्या पुढाकाराणे तलाठी कार्यालयाचे उदघाटन

1419

वरोरा : तालुक्यातील कव्हडापूर येथील श्री. संत भोजाजी महाराज शेतकरी गट कव्हडापूर च्या वतीने तलाठी कार्यालय साजा क्र. 36 कवडापूर येथे तलाठी कार्यालयाच्या बिल्डिंगला स्वखर्च लावुन रंग रंगोटी केली. जुनी बिल्डिंग असल्याने तलाठी अधिकार्‍यांना बसायला जागा नव्हती. तर संत भोजाजी महाराज शेतकरी गटाने पुढाकार घेउन शेतकऱ्यांच्या हितासाठी तलाठी कार्यालय उभारले. या तलाठी कार्यालचे उदघाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे हस्ते पार पाडले.

.       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समिती चे सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, नवनियुक्त तलाठी फरकाडे, शिवदूत बंडु डाखरे, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, सरपंच चंद्रशेखर चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन इशांत मांगरुडकर व संचालन तुषार उराडे यांनी केले. शेतकरी गटातून एव्हडी मोठी गावाला मदत करणे ही गौरवाची बाब आहे अशे व्यक्तव्य शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले.
त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरी वैद्य, संतोष मांगरुडकर, पोलीस पाटील राकेश मांगरुडकर, गणेश चौधरी, चिंदूजी परचाके, तुषार भडे, देवराव भडे, आदित्य सोनवणे, प्रतीक वरघणे, घुमेश उराडे, कुणाल मंदाडे व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.

error: Content is protected !!