- सहभाग नोंदविण्याचे आवाहन
वरोरा
पोषण आहार सप्ताहनिमित्त उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .
सदर सप्ताह १ ते ७ सप्टेंबर या दरम्यान होणार असून यात पोषण आहार विषयी वेगवेगळ्या पाककृती स्पर्धा, आरोग्य शिक्षण स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा होणार आहे तर पोषण आहार विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पुर्ण सप्ताहात बचतगट आरोग्य सेविका,आशावर्कर, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अधीसेविका वंदना विनोद बरडे उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्याशी संपर्क करावा.
या कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षक,जनरल सर्जन डॉ प्रफुल्ल खूजे, अधीसेविका वंदना विनोद बरडे , आहारतज्ज्ञ गीतांजली ढोक, समुपदेशक वंदना बुर्रेवार,यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यांत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजिका अधीसेविका वंदना विनोद बरडे उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी केले आहे


