राष्ट्रीय आंतर शालेय तबला वादन स्पर्धेत अनुराग चांदेकर द्वितीय

10

तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थाचे यश 

नेरी : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय आंतर शालेय तबलावादक स्पर्धेत नेरी येथील अनुराग संजय चांदेकर, या विद्यार्थ्यांने द्वितीय क्रमांक पटकावला.

.       राष्ट्रीय आंतर शालेय तबला वादन स्पर्धा घेण्यात आली. यात देशातील विविध शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात नेरी येथील अनुराग संजय चांदेकर याने घवघवित यश प्राप्त करून देशात द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याबद्दल त्याला प्रमाणपत्र व नोकिया स्मार्टफोन देऊन गौरविण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.