Home सामाजिक शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केला चित्रपट निर्माते अनिल वरखडे यांचा सत्कार

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केला चित्रपट निर्माते अनिल वरखडे यांचा सत्कार

871

 

वरोरा : येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा मराठी चित्रपट निर्माते अनिल नारायणराव वरखडे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी सुभेदार चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चिंग कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना परिवाराच्या वतीने सत्कार केला.
वरोरा नगर पालिकेचे माजी नगरसेवक तथा चित्रपट निर्माते अनिल वरखडे यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात नावलौकिक केले आहे. शेरशिवराज, सापळा ,केस नंबर ९९ व नुकताच प्रसिद्ध झालेला सुभेदार असे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वरोऱ्याच्या सुपुत्राने मराठी चित्रपट श्रुष्टीत रोवलेले पाऊल हे वरोरा वासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे वक्तव्य शहरात नुकताच पार पडलेल्या पोस्टर लॉन्चिंग कार्यक्रम दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी चित्रपट निर्माते वरोऱ्याचे सुपुत्र अनिल वरखडे यांचा शिवसेना परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश यादव , उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शहर प्रमुख संदीप मेश्राम ,सामाजिक कार्यकर्ते सुनील वरखडे , उपतालुका प्रमुख सागर पिंपळशेंडे, शिवदूत मेघश्याम शेंडे, शिवसैनिक मारोती जोगी व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!