राज्य अभियंता संघटनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित

12

सिंदेवाही : राज्य अभियंता संघटना ही एक ट्रेड युनियन अंतर्गत नोंदणी प्राप्त राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व कंत्राटदार यांचा समावेश असलेली संघटना आहे. राज्य अभियंता सघंटना ही सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी लढणारी संघटना आहे.

.        जिल्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे अडचणीवर मात करण्यासाठी नुकतेच चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यामधे राज्य अभियंता संगठनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर झालेली आहे. त्यामधे जिल्हा अध्यक्ष जगदिश लवाडिया, जिल्हा महासचिव ओंकार उपलंचीवार, कार्याध्यक्ष नितेश गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष शादाब शेख, सूरज धवस, देविदास आंबीकर, मुरली धुळसे, सचिव प्रियकांत किरदक, सहसचिव रूपेश निकोडे, संचालक अक्षय वाढई, प्रतिनिधी सतीश दैवलकर, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मीकांत कामतवार, कोषाध्यक्ष अक्षय डफ, प्रवक्ता लोकेश कोटरंगे, पुरुष संघटक मयुर गजरलेवार, महिला संगठक रुबीना शेख, प्रणाली ढेंगळे आदीचा समावेश आहे.

.       यावेळी राज्य अभियंता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इंजि. जगदीश लवाडिया, जिल्हा महासचिव ओंकार उपलंचीवार, नितेश गजबिये, शादाब शेख, कृणाल पावडे, लखन पवार, मयुर गाजरलेवार, प्रतीक चवरे, हर्षल उपरे, कल्याण वैद्य, अक्षय दरने, गौरव भागवत, ऋषिकेश वाघ, अक्षय वढाई, ईश्वर लवडिया हे उपस्थित होते.