बैलजोडी सजावट स्पर्धेत चिनोरा येथील बैलजोडी प्रथम

24

बैलजोडी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

वरोरा : बैल पोळा सणाचे औचित्य साधून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किशोर टोंगे यांनी बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील ७०० पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट बैलजोडी सजावट म्हणून निवड झालेल्या शेतकरी बांधवांना विविध जीवनावश्यक वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या.

.    या स्पर्धेत प्रथम क्रमांक चिनोरा ता. वरोरा येथील शेतकरी नितेश ठमके, द्वितीय क्रमांक महालगाव ता. वरोरा येथील जीवन माकोडे तर तृतीय क्रमांक विभागून आदित्य बोधाने तुमगाव, आदर्श चांभारे नंदोरी, संदीप आसुटकर जामगांव, रोशन पुसदेकर सोईट, पुरुषोत्तम चंदनखेडे माढेळी यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांना फ्रिज, द्वितीय टीव्ही तर तृतीय क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांना मिक्सर भेट देण्यात आला असून एकूण 57 शेतकऱ्यांना बक्षीस देण्यात आले.

.     या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे डॉ. सागर वझे, ओम मांडवकर, प्रवीण ठेंगणे, गोपाल वर्मा, डॉ. अंकुश आगलावे, कीर्ती कातोरे, प्रणिता शेन्डे, संगीता निंबाळकर, अनिता दुशेट्टीवार, सुरेश महाजन, विजय वानखेडे, देविदास ताजने व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव लोहकरे यांनी तर आभार प्रदर्शन शुभम आमने यांनी केले.