आरटीओ च्या भरधाव वाहणाने दोन गायीला चिरडले

26

वरोरा शहराकडे आरटीओ च्या फेऱ्या वाढल्या

चंद्रपूर : भरधाव वेगात असलेल्या चंद्रपूर आरटीओ च्या स्कार्पिओ वाहणाने चंद्रपूर नागपूर महामार्गवरील घोडपेठ गावाजवळ दोन गायीना उडविले यात एका गायीचा जागीच मृत्यू झाला तर एक गाय गंभीर जखमी आहे. ही घटना सुट्टीच्या दिवशी रविवारला सायंकाळी घडली.

.       प्राप्त माहितीनुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर चे अधिकारी स्कोर्पिओ क्रमांक MH04KR6434 या वाहणाने सुट्टीच्या दिवशी रविवारला मोहिमेवर निघाली. दरम्यान चंद्रपूर नागपूर महामार्गावरील घोडपेठ गावाजवळ रस्ता ओलांडत असलेल्या दोन गायीना भरधाव वेगात असलेल्या आरटीओच्या स्कार्पिओ वाहनाने जबर धडक दिली. यात एका गायीच्या जागीच मृत्यू झाला तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली आहे. तिचा ही मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. धडक इतकी जबर होती कि आरटीओच्या स्कार्पिओ वाहनाचा समोरील भाग दबल्या गेला. वाहने हळू चालवा सुरक्षित रहा, असा प्रत्येक वाहनधारकाला कायद्याचा सल्ला सांगणारे आरटीओ अधिकाऱ्याचे वाहनच धूम ठोकत असल्याने कायदा हा फक्त सामान्य नागरिकांसाठीच का असा सवाल आता सामान्य नागरिक करू लागला आहे.

आरटीओचा फटका शालेय विद्यार्थ्यांना                                                                                                                                          आठवड्यातील आठही दिवस आरटीओचे वाहन चंद्रपूर नागपूर महामार्गावर दिसून येतात. विनाकारण वाहनांना थांबवून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्या जात असल्याचा आरोप काही वाहनधारकाकडून होत आहे. तर या आरटीओ चा फटका वरोरा शहरातून खेडोपाड्यात जाणाऱ्या शाळेतील मुलांना बसत आहे. आरटीओचे वाहन दिसले की ऑटो, स्कूल बस चे चालक एखाद्या गल्लीतून किंवा एखाद्या गावात किंवा लेआउट मध्ये वाहन टाकून आरटीओ जाण्याची वाट बघत असतात. 5 वाजता शाळेला सुट्टी होत असते. मात्र आरटीओच्या धाकामुळे स्कूल बस चालक किंवा ऑटो चालक आरटीओ गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शाळेतील चिमुकल्या पोरांना घरी पोचवत असतात. या वसुली आरटीओ अधिकाऱ्यांवर कोण वचक लावणार असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहे.