पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती तर्फे नवनियुक्त पोलीस आशिष शेळकीचा सत्कार

580

वरोरा : शहरातील होतकरू व मेनबतीच्या जोरावर संघर्ष मय प्रवास करणारा आशिष हिरामण शेळकी यांची नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती झाली.आशिष यांचे शिक्षण व संघर्ष मय जिवन वरोरा शहरांत आनंदवन च्या ग्राउंड वर गेले.

.       भरती आली कि ग्राउंड वर कसरत, रनिंग करणे व वाचलायलय मध्ये अभ्यास करणे असा सहा वर्षांपासून संघर्ष मयप्रवास सुरु होता. ऑगस्ट 2024 ला आशिष ने भरती दिली व नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा च्या वतीने आशिष शेळकी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी उत्सव समितीचे संस्थापक प्राध्यापक संजय बोधे, आयोजक गणेश चिडे, अध्यक्ष अजिंक्य काळे, सदस्य आकाश ढवळे, तुषार सायंकार व शेळकी परिवार उपस्थित होते.

.       आशिष पोलीस पदावर सामान्य जनतेला योग्य न्याय देणार याचा आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा अशे व्यक्तव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे संस्थापक प्राध्यापक संजयजी बोधे यांनी म्हटले.