शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तालुकास्तरीय समितीची सभा

8

सर्व व्यवस्थापनाच्या 150 मुख्याध्यापकांची उपस्थिती

नागभीड : देशात व राज्यात विद्यार्थ्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना घडता कामा नये यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करता येईल त्यात मुख्याध्यापकांची भूमिका काय असेल यावर मार्गदर्शन करण्यासाठी नागभीड तहसील चे तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली 23 ऑगस्ट रोजी प्रायमरी टीचर्स सोसायटी च्या सभागृहात तालुका स्तरीय समितीची सभा घेण्यात आली.

.       यात प्रमुख अतिथी म्हणून नागभीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय पालवे, महिला व बाल विकास अधिकारी गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष गड्डमवार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रामटेके, आरोग्य विस्तार अधिकारी पिसे, पंचायत विस्तार अधिकारी राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी भंडारे ह्या प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

.       शालेय विद्यार्थ्यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने आजपर्यंत जे शासन निर्णय निर्गमित झाले तसेच नुकतेच 2 दिवसापूर्वी शासन निर्णय आलेत त्याबद्दल सर्व मुख्याध्यापकांना त्याचे गांभीर्य तहसीलदारांनी लक्षात आणून दिले. त्यात गठीत करावयाच्या शाळा स्तर, केंद्र स्तर व तालुका स्तर समितीच्या संबंधाने व योग्य अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत निर्देश दिले, जर यात कोणत्याही स्तरावर कोणत्याही घटका मार्फत हय गय किंवा निष्काळजीपणा केला गेली तर तालुका दंडाधिकारी म्हणून संबंधितांना कठोर कारवाही समोर जावे लागेल याची सुद्धा जाणीव सर्व मुख्याध्यापकांना करून दिली.

.       सभेला गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सुद्धा विद्यार्थ्यांप्रती मुख्याध्यापक, व शिक्षक यांची जबाबदारी व त्यांचे शिक्षण, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य कसे उत्तम राखावे याबाबत मार्गदर्शन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, विद्यार्थी व विद्यार्थिनींचे समुपदेशन करिता आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांची मदत घेता येईल याबाबत सांगितले.