राजुरा : बदलापूरातील अत्याचार, बंगलादेशातील हिंदूवरील अत्याचार व राज्यात महिला, अल्पवहिन मुली व विकलंग मुली सुद्धा सुरक्षित नसल्याने अत्याचाराच्या वाढत्या घटनाच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून महाविकास आघाडी गडचांदूर शहराच्या वतीने राज्य सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला.
. या निषेधाला अरूण निमजे माजी जि. प. सभापती, चंद्रपूर, गटनेता, तालुका प्रमुख शिवसेना सागर ठाकूरवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पापया पोन्नमवार, रामदास डाहुले, काँग्रेस अध्यक्ष संतोष महाडोळे, माजी नगराध्यक्ष सचिन भोयर, गटनेते विक्रम येरणे, काँ.तालुका अध्यक्ष आशा खासरे, वैशाली गोरे नगरसेवक, सुनिता कोडापे नगरसेवक, अरविंद मेश्राम नगरसेवक, रा.तालुकाध्यक्ष मयूर एकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.