सम्यक जीवने सायबर सिक्योरिटी पदवी ने सन्मानित

19

बल्लारपूर : येथील वरिष्ठ पत्रकार अ‍ॅड.मंगल जीवने यांचे चिरंजीव इलेक्ट्रॉनिक इंजीनियर सम्यक जीवने यांनी लंडन मधील वार्विक युनिवर्सिटी (युके) मधून सायबर सिक्योरिटी मॅनेजमेंट ( मास्टर ऑफ सायन्स ) मध्ये प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. त्याचा सत्कार सोहळा २६ जुलै रोजी वार्विक युनिवर्सिटी च्या ” ग्रॅज्युएशन डे ” २०२४ या कार्यक्रमात वार्विक युनिवर्सिटी चे व्हाईस चांसलर व अध्यक्ष बाॅरोनेस कॅथी ऑस्टन व रजिस्ट्रार राॅबिन क्लार्क यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

.       सम्यक यांनी आपल्या यशाचे श्रेय आई,वडील व गुरूजनांना दिले आहे.त्याचेवर सर्वत्र मित्रमंडळ कडून कौतुकाची थाप पडत आहे.