Home Breaking News सुर फाउंडेशनच्या वतीने थोराणा शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण

सुर फाउंडेशनच्या वतीने थोराणा शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण

1363

चंद्रपूर : स्व. नंदू सुर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुर फाउंडेशन माजरीच्या वतीने थोराणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

.      सुर फाउंडेशनचे संयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर यांनी विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण केले. यावेळी  मनगाव येथील खामनकर, प्रमोद आस्वले, मुख्याध्यापक अरुण उमरे आदी उपस्थित होते.

.      शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पुढील वर्षीही गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करू, असा मानस प्रवीण सूर यांनी व्यक्त केला. शाळेच्या वतीने सूर फाउंडेशनचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!