विद्युत संचात बिघाड : लोहारा येथील पाणीपुरवठा ठप्प

475

तात्काळ वीजपुरवठा करा अन्यथा आंदोलन : सरपंच दिक्षा पाटील

एक महिन्यांपासून नळाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत

नेरी : नेरीवरून जवळ असलेल्या लोहारा येथील नळांना मागील एक महिन्यांपू पासून वीद्युत संचात बिघाड आल्याने पाणी पुरवठा नसल्याने लोहारा वाशीय पाण्यासाठी वणवण करीत असून ग्रा. प. लोहारा यांनी वीज वितरण मंडळ नेरी यांना वारंवार तक्रारी व सूचना करूनही दुर्लक्ष होत आहे. तेव्हा वीज वितरण मंडळने तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करून तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीज मंडळाच्या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा लोहारा येथील सरपंचा दिक्षा पाटील यांनी दिला आहे.

.      लोहारा हे मोठे गाव असून या गावात पाणी पुरवठा योजना असून प्रत्येक घरात हर घर जल हर नळ योजनेतून पाणी पुरवठा केला जातो अनेक वर्षांपासून ही योजना सुरू आहे. मात्र मागील एक महिन्यापासून सदर गावातील पाणी पुरवठा थांबला असून नळाला पाणी नाही सदर पाणीपुरवठा हा विद्युत संचात बिघाड आल्याने बंद झाला आहे. याबाबत या परिसराच्या विद्युत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या तसेच वीज वितरणाच्या नेरी मंडळाला सूचना व तक्रार देऊनही एक महिना लोटूनही अजूनपर्यंत विद्युत संच दुरुस्त केला नसल्याने गावातील संपुर्ण पाणी पुरवठा बंद झाला आहे.

.      एकीकडे शासन म्हणते की पाणीपुरवठा हा नियमित सुरू राहावा पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये प्रत्येक गावात नळ योजनेचे पाणी पोहचलेच पाहिजे आणि ते नियमित सुरू राहावे अश्या सर्व विभागाला सूचना आहेत मात्र वीज वितरण मंडळाच्या दिरंगाईमुळे त्गावातील नागरिकांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असून या पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने वीज वितरण कंपनी विरुद्ध नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. अनेकदा तक्रारी सूचना ग्रा प च्या वतीने वीज महामंडळाला देण्यात आल्या. मात्र अजूनही विद्युत संचात दूररती करण्यात आली नसून दुर्लक्ष होत तेव्हा संबंधित विभागाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन विद्युत संच दुरुस्त करून वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी सरपंच दिक्षा पाटील मॅडमनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेऊन वीज वितरण महामंडळाच्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.