बिबट्याने घरात घुसून दोन बकऱ्याना केले ठार

65
  • वाघेडा येथील घटना 

 नेरी,

नेरीवरून जवळ असलेल्या आणि ताडोबा प्रकल्पाला लागून असलेल्या वाघेडा येथील प्रभाकर रणदिवे यांच्या घरात बांधून असलेल्या दोन बकऱ्यावर बिबट्याने हमला करून जागेवरच ठार केले

सविस्तर असे की आज दि 24 ला सायंकाळी 7 30 वाजता दरम्यान गावाशेजारी दबा धरून असलेल्या बिबट्याने अंधार पडताच रणदिवे यांच्या घरात घुसून बांधलेल्या दोन बकऱ्यावर हमला केला यात बकऱ्या जागीच ठार झाल्या त्यांच्या ओरडण्यामुळे ही बाब माहीत झाली तात्काळ बघीतले असता आरडाओरडा होताच बिबट्या पसार झाला सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे वृत्त लिहिपर्यंत पंचनामा व्हायचा होता सदर बकऱ्यांच्या मृत्यने मालकावर संकट कोसळले आहे तेव्हा वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे