मुल कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजनदान 

17

मुल : नवभारत कन्या विद्यालय,मूल येथे समुदाय भोजन दिन उपक्रमअंतर्गत शालेय पोषण दिवसाचे औचित्य साधुन कृषी उत्पन्न बाजार समिती मूलच्या वतीने विद्यार्थीनीना मसाला भात व लाडूचे जेवण देण्यांत आले.

.       शालेय पोषण दिनाचे दिवशी समुदाय भोजनास ४०० ते ५०० विदयार्थीनीने सहभाग घेवून जेवनाचा आनंद घेतला. या आयोजित कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक घनश्याम येनुरकर, किशोर घडसे, सामाजीक कार्यकर्ते संदिप मोहबे, विष्णु सादमवार उपस्थितीत होते. तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का राजमलवार, सहा. शिक्षक विजय सिध्दावार, व शाळेतील शिक्षक व शिक्षीका वृंद उपस्थितीत होते.