पॅनल बोर्ड कंपनीचे करणार पुनर्जिवित
राष्ट्रीय उद्योग समूहाची हालचाल
विसापूर/चंद्रपुर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत १९७२ पासून इंडियन प्लाय वुड कंपनी म्हणून कार्यरत होती. ही कंपनी सन २00८मध्ये बंद पडली.परिणामी विसापूर येथील कामगारांवर उपासमारीचे संकट आले. स्थानिक कामगार देशोधडीला लागले. आता मात्र पनल बोर्ड कंपनी पुनर्जीवित होणार आहे. बंद पडलेल्या बल्लारशाह प्लाय वुड कंपनीत राष्ट्रीय उद्योग समूहाने हालचाल सुरु केली असून त्या ठिकाणी बांबू प्रकल्पावर आधारित उद्योग सुरु करण्याचे योजिले आहे.
. बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १७ हजारावर आहे.येथे पूर्वी चुनाभट्टी, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, बल्लारपूर प्लायवुड कंपनी आदी उद्योग सुरु होते. मात्र ते सर्व उद्योग बंद पडले.यामुळे येथील कामगारांवर मोठे संकट आले. येथील कर्मचारी देशोधडीला लागले. केवळ बल्लारपूर पेपर मिल उद्योग सुरु आहे. या उद्योगात देखील मोजकेच कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला आहे. परिणामी विसापूर गावातील अर्थ व्यवस्था कमालीची खालावली आहे.
. बल्लारपूर प्लायवुड कंपनी ला वन विभागाने ९९ वर्षांच्या भाडे तत्वावर 31 एकर जमीन दिली होती. ही जमिन वन विभागाने १९८९ मध्ये सदर कंपनीच्या नावाने केल्याची माहिती आहे. बल्लारशाह प्लायवुड कंपनी २00८ पर्यंत चालू होती. मात्र कंपनीत कामगार संघटनेच्या तगाद्यामुळे कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना मध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने उत्पादन बंद करुन ताळे ठोकले.तेव्हा पासून कंपनी बंद झाली आहे.
. आता राष्ट्रीय उद्योग समूहाने या उद्योगात लक्ष घातले आहे. बल्लारशाह प्लायवुड कंपनी ला पुनर्जिवित करण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले आहे. कोलमडून पडलेल्या उद्योग सुरु करुन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मानसिकता तयार केली आहे. पैनल बोर्ड लि.कंपनी उद्योग पुन्हा सुरु होणार आहे. आता या कंपनीत बांबू आधारित प्रकल्प सुरु करुन रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
“पैनल बोर्ड लि.कंपनीचे शासकीय सोपस्कार पूर्ण केले जात आहे. या कंपनीचे संचालक मंडळातील काही संचालक बदली आहे. बंद पडलेल्या उद्योगात नव्याने सुरवात केली जाणार आहे. या ठिकाणी नवीन बांबू प्रकल्पावर काम चालू आहे. लवकरच शासन व प्रशासनाच्या सहकार्याने हा उद्योग सुरु करण्यात येणार आहे. सुनील कुमार मांडवे कंसल्टेंट डायरेक्टर, पैनल बोर्ड लि.कंपनी, बल्लारशाह.