चंद्रपुर
खुनाच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या एका 20 वर्षीय तरुण आरोपीने पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याचा प्रकार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये रविवारी सकाळीस उघडकीस आली .या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे . समाधान माळी असे मृतक आरोपीचे नाव आहे .

या तरुणाने आंनंदवन येथे राहत असलेल्या 24 वर्षीय विवाहित महिलेचा प्रेम प्रकरणातून खून केला होता . त्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती . पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली तर वरोरा पोलीस स्टेशन मध्ये दिवसेंदिवस गुन्ह्याचा आलेख वाढत असल्याने पुन्हा वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे . आरोपीने पोलीस ठाण्यात गळफास लावल्याची वार्ता माहीत होताच वरोरा वासीयांनी पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली आहे .