९ महिन्याच्या बाळाला विष पाजत आईने घेतला गळफास

2788
  • आईचा मृत्यू : बाळाची प्रकृती चिंताग्रस्त 
  • शेगाव येथील घटना

वरोरा

.        वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील एका २७ वर्षीय महिलेने आपल्या ९ महिन्याच्या बाळाला विष पाजून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १. ३० वाजताच्या सुमारासशेगाव येथे घडली. मृतक मातेचे नाव पल्लवी मितेश पारोधे (२७) असे तर स्मित मितेश पारोधे (९ महिने ) असे मुलाचे नाव आहे. स्मित वर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते

..              प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवती सोबत रितिरिवाजाने लग्न झाले. त्यांना ९ महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास मितेश पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध पडला होता तर पल्लवी ने गळफास लावला होता. ही माहिती शेगाव पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पल्लवी चा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला पल्लवीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करित आहे..

माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच  

.             मुलीच्या लग्नानंतर काही महिन्यातच सासर कडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला होता.        तिने याबद्दल आम्हाला सांगितले पण आम्ही तिला समजावून सांगत होतो. नातू झाल्यानंतर आता तरी चांगले राहतील असा विश्वास होता. मात्र दिवसेंदिवस तिला सासर कडून पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या नातवाची व माझ्या मुलीची तिचा पती व सासू यांनीच हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे