माजरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनले पोलीस निरीक्षक

29

सारंग मिराशी यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

माजरी : नुकत्याच चार महिन्यापूर्वी माजरी पोलिस स्टेशन पदभार स्वीकारलेले आणि अल्पवधीतच माजरी गावाची धडकन बनलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यांची नागपूर येथे बदली झाली आहे. कर्तव्यदक्ष ठाणेदार सारंग मिराशी यांच्या पदोन्नती मुळे त्यांचा व्हाईस ऑफ मीडिया माजरी च्या वतीने सत्कार करण्यात आला.

.       व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य यांनी ठाणेदार सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा पर्यावरण दिवसाच्या अवचित साधून त्यांच्या हस्ते माजरी पोलीस स्टेशन येथे एक फळ वृक्ष लावून त्याचा सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारिता व पत्रकार यांच्या हितासाठी झटणारी देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना आहे. सदर संघटनेच्या नियोजनानुसार व्हॉईस ऑफ मीडिया माजरीच्या वतीने ठाणेदार सारंग मिराशी यांचा पीआय पदी निवड झाल्याबद्दल शनिवारी सत्कार करण्यात आले.

.        याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाच्या भद्रावती तालुका कार्यकारिणीचे सहसचिव रवि भोगे, संघटक चैतन्य कोहळे, सदस्य रवि कुडूदुला, संदीप झाडे उपस्थित होते.