राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 वा वर्धापन दिन वरोऱ्यात साजरा

35

वरोरा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन सप्ताह वरोरा येथे साजरा होत आहे. 10 जून ला सकाळी 10.10 वा ध्वजारोहण करण्यात आला.

.      ध्वजारोहण नंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारताच्या राज्यघटनेतील उद्देशिका चे वाचन करण्यात आले. वरोरा विधानसभा मतदारसंघातील गाव पातळीतील प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांचे जेष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना शतायुषी व्हा च्या शुभेच्छा देऊन त्यांच्या शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ना. गो. थुटे, झामराव लांबट, तानेबाई लांबट, डोमाजी वाटेकर, त्रिवेणी वाटेकर, गणपत वांगे, बारकू एकरे, सुमनबाई तिखट, नानाजी मुसळे, त्रवेना मुसळे, सुनीता आवारी इत्यादी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

.      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलास नेरकर, रंजना पारशिवे, जनाबाई पिपंळशेडे, चंद्रकांत कुंभारे, रवींद्र भोयर, योगिता लांडगे, सुनीता नरडे, दिलीप खैरे, सुधाकर उपरे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते