Home सामाजिक बल्लारशाह तून नंदीग्राम ट्रेन चा कोटा वाढवा आणि बल्लारशाह कुर्ला डेली करा

बल्लारशाह तून नंदीग्राम ट्रेन चा कोटा वाढवा आणि बल्लारशाह कुर्ला डेली करा

1366

अजय दुबे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

बल्लारपूर : बल्लारशाह मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये बल्लारशाह ट्रेन मधील आपत्कालीन कोटा वाढविण्याचे आणि बल्लारशाह कुर्ला ट्रेन डेली करण्याचे निवेदन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि BPQ स्टेशन अधीक्षक रवींद्र नंदनवार यांना अजय दुबे, सदस्य ZRUCC मुंबई सेंट्रल रेल्वे यांनी सादर केले.

.      निवेदनात म्हटले आहे की, येथून नंदीग्राममध्ये स्लीपरमध्ये केवळ 4 आणि थर्ड एसीमध्ये 2 जागांचा कोटा आहे, तसेच सेकंड आणि फर्स्ट एसीमध्ये कोणताही कोटा नाही. त्यामुळे स्लीपरमध्ये 35, थर्ड एसीमध्ये 25 आणि सेकंड एसीमध्ये 15 जागांचा कोटा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच 22110 बल्लारशाह कुर्ला साप्ताहिक गाडी दररोज वर्धा मार्गे चालवावी, जेणेकरून या मार्गावरील प्रवाशांना कमी वेळेत मुंबई गाठता येईल.

error: Content is protected !!