राळेगावच्या आदर्श दुर्गा महिला मंडळाच्या वतीने रविंद्र शिंदे यांचा सत्कार

34

भद्रावती  : सतत दिवसरात्र जनसेवा करीत शेतकरी शेतमजुर यांना नेहमी मदत असलेले तसेच कोवीड-19 कोरोणाकाळात निस्वार्थ सेवा प्रदान करणारे, सन 2022-23 मध्ये पुढाकार घेवुन पुरग्रस्त भागात अन्नधान्य किट वाटुन मदत केल्याबद्दल आदर्श दुर्गा महिला मंडळ राळेगाव पदाधिकारी यांनी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचा त्यांच्या निवास्थानी शाल श्रीफळ नुकताच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

.      हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला अनुसरुन तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठकारे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने 75-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे रविंद्र शिंदे यांचे समाजाकरीता करीत असलेले कार्य, सहकार्य यांचा कुठेतरी गौरव व्हावा हा उदान्त हेतु मनात ठेवून भद्रावती तालुक्यातील राळेगाव येथील आदर्श दुर्गा महिला मंडळ पदाधिकारी सुवर्णा थेरे, देवका खामनकर,  गिता खामनकर, लता रांगणकर, छाया परचाके, रुखमा झाडे, माला आवारी यांनी मंडळातर्फे यांनी आज रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या भागातील समस्याचे निराकरण करण्यासंदर्भाने विनंतीपुर्वक निवेदन दिले. याप्रसंगी रविंद्र शिंदे यांनी लवकरात लवकर यासंबंधाने निर्णय घेवून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

.      याप्रसंगी आदर्श दुर्गा महिला मंडळ राळेगाव पदाधिकारी तसेच राजेश तिखट, सुनिल थेरे, अशोक मारेकर यांच्यासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले उपस्थित होते.