तहसीलदारांचे आवाहन
घरकुल धारकांना मिळणार मोफत रेती
वरोरा : सध्या चंद्रपुर जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी घरकुल योजना ठप्प झाली. त्यामुळे वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर यांनी पुढाकार घेत जप्ती केलेला अवैद्य रेती साठा तात्काळ घरकुल धारकांना उपलब्ध करून देत असल्याने घरकुल धारकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या गावात अवैद्य रेतीचा साठा आढळल्यास नागरिकांनी तात्काळ महसूल विभाग वरोरा येथे कळवावे. माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. जप्ती केलेला रेती साठा त्याच गावातील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे माहिती महसूल विभाग वरोरा कडून दिल्या जात आहे.
. प्रत्येकाला घर असा शासनाचा संकल्प असून वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गरजू कुटुंबांना घरकुलचे वितरण करण्यात आले. मात्र यावर्षी रेती घाटांचे लिलाव झाले नाही. चोरटी रेती घेणे घरकुल धारकांना परवडण्यासारखी नाही त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना रेती अभावी घराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. त्यामुळे वरोर्याचे तहसिलदार यांनी अवैद्य रेती विरोधात मोहीम राबवत जप्त केलेली रेती घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करत त्यांना दिलासा दिला आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलसाठी जप्त केलेली रेती देण्याबाबतची तरतूद अप्पर सचिव महसूल व वनविभाग यांचे कडील पत्रा नुसार तसेच प्रधानमंत्री, रमाई, शबरी, यशवंतराव चव्हाण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पण रेती अभावी घरकुलाचे काम न सुरू झालेल्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबतची यादी तहसील कार्यालयाची प्राप्त झाली.
. त्यानुसार जप्त केलेली दिनांक 14 मे 2024 रोजी ताडळा भोपापूर गावानजीक सरकारी जागेवरती अंदाजे 24 ब्रास रेती साठा निनावी अवैधरित्या साठवणूक केली असल्याचे आढळून आला. असल्याने सदर रेतीसाठे तहसील कार्यालयाच्या पथकाद्वारे जप्त करण्यात आला व खापरी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच, पोलीस पाटील व गावकरी यांचे समक्ष खापरी टाकळी ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या आठ घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन ब्रास याप्रमाणे सदर येथे साठा मोफत तहसील कार्यालय मार्फत पुरविण्यात आला आहे. ज्या नागरिकांना रेती साठा आढळल्यास त्यांनी वरोरा महसूल प्रशासनाला माहिती द्यावी. जेणेकरून या रेतीमुळे घरकुल धारकांचे घराचे स्वप्न पूर्ण होतील. ज्या गावात हा रेती साठा असेल त्या गावातील लाभार्थ्यांना रेती वाटप करण्यात येईल जर त्या गावात घरकुल लाभार्थी नसेल तर शेजारच्या गावातील लाभार्थ्यांना रेती वाटप करण्यात येईल. त्यामुळे गावकर्यांनी महसूल विभागाला सहकार्य करावे. अशी माहिती महसूल विभाग वरोरा यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.


