भद्रावती : पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीची हॉटेल सनी पॉइंट भद्रावती येथे दि 10 मे ला बैठक आयोजित करण्यात आली. त्यात सर्वानूमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती च्या अध्यक्षपदी डॉ. ज्ञानेश हटवारर यांची निवड करण्यात आली.
. यात उपाध्यक्ष मनोज मोडक, सचिव प्रवीण चिमूरकर, कोषाध्यक्ष- शिरीष उगे, संपर्क प्रमुख हर्षल रामटेके, प्रसिद्धीप्रमुख आशिष कोटकर, सदस्य म्हणुन उमेश कांबळे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या मार्गदर्शनात पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती च्या वतिने नवीन शैक्षणिक वर्षांत जि.प. शाळेतील मुलांना शालेय साहित्य वितरण करण्याचे ठरविण्यात आले.
. पुरोगामी पत्रकार संघाचा विस्तार व पुरोगामी पत्रकार संघ सामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणुन ओळख निर्माण करेल असा निश्चय नवनियुक्त अध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार यांनी व्यक्त केला आहे.


