श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व परम पुज्य भागवत सत्संग सोहळा संपन्न
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे आयोजन
गरजूंना आर्थिक मदत तर दिव्यागांना सायकल वाटप
समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
७१ भजन मंडळांचा सहभाग
भद्रावती : अक्षय तृतीया सणाचे औचित्य साधून श्री सदगुरु श्री संत गजानन महाराज, सदगुरु श्री संत साईबाबा, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ बाबा, भांदेवाडा यांच्या पादुकांचे पुजन, दर्शन व परम पुज्य भागवतमनिषी श्री मनिष महाराज यांचा भागवत सत्संग सोहळ्याचे स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे आयोजन करण्यात आले होते.
. यावेळी मंचावर परिसरातील सदगुरु संताची उपस्थिती होती. वढा येथील संत चैतन्य महाराज, हरणघाट येथील संत मुर्लीधर महाराज, चंद्रपूर येथील संत मधुबाबा महाराज, विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथील संत बबनराव धानोरकर, संत डाखरे महाराज, निरंकारी सत्संग मंडळ भद्रावतीचे किसनराव माटे तसेच जगन्नाथ महाराज मठ भद्रावतीचे केशव ताजणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावरील संतांनी उपस्थित भाविक भक्तांना आध्यात्मीक मार्गदर्शन केले.![]()
. या निमित्ताने विविध क्षेत्रातील मौलीक योगदान असलेल्या मान्यवरांचे यावेळी स्मृतीचिन्ह, नारळ पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आले. यात प्रामुख्याने गुरुदेव सेवा मंडळ मोझरी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, गुरुदेव सेवा मंडळ वरोरा रुपलाल कावडे, निरंकारी सत्संग भद्रावती किसन माटे, गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती विशाल गावंडे, किर्तनकार केशवानंद मेश्राम, धार्मिक सामाजिक कला क्षेत्रातील सुवर्णा पिंपळकार व प्रकाश पिंपळकर, आध्यात्मीक व सामाजिक क्षेत्रातील झनक चौधरी, बाळासाहेब पळवे, निस्वार्थ सेवा क्षेत्रात योगदान देत असलेले गवराळा अरुण पोपळी, कृषी क्षेत्रात योगदान स्नेहलता गिरडे, श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान कमेटी भद्रावती नरेन्द्र पढाल, रुग्णसेवा क्षेत्रात योगदान रुग्णसेवक पंकज कातोरे, वेषभुषा रुपसज्जा क्षेत्र भैय्याजी मिरगे, संतोषी बँड पार्टीचे विजय मुंगरे, रुग्णसेवक गोसेवक ताडाळी येथील विनोद गोठी, भाऊराव खुटेमाटे, पुरातन वस्तु संग्रहकर्ता तसेच सामाजिक क्षेत्रात योगदानबद्दल अमित गुंडावार, कृषी करीता नरेश काळे व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच पादुका दिंडीत उपस्थित भजन मंडळींचे सन्मान सत्कार करण्यात आले.![]()
. या सोहळ्याचे औचित्य साधून ट्रस्टतर्फे तालुक्यातील नंदोरी येथील रत्नमाला पुरुषोत्तम चामाटे यांच्या घरचा कर्ता मुलगा मरण पावल्यामुळे ट्रस्टचा उपक्रम “विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम” अंतर्गत आर्थीक सहकार्य करण्यात आले. तर स्थानिक जवळे प्लॉट येथील रहिवासी मधुकर लक्ष्मण नागपूरे यांना लकवा झाल्यामुळे चालणे फिरणे बंद झाल्याकारणाने ट्रस्टच्या “हिन्दुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना” अंतर्गत दिव्यांग घरगुती उपयोगाची सायकल प्रदान करण्यात आली. यांच्या धर्मपत्नी इंदिरा मधुकर नागपुरे यांनी ती स्वीकार केली. ![]()


