Home विदर्भ पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाही करा 

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाही करा

838
  • व्हाईस ऑफ मिडीयाचे उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन 

चंद्रपुर

.          जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पत्रकारांवर हल्ला करणार्यांरचा व्हॉइस ऑफ मिडीया च्या वतीने निषेध करण्यात आला असून आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाही करा या मागणीचे निवेदन व्हॉइस ऑफ मिडीया वरोरा च्या वतीने उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले .

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मिडीया च्या वतीने निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्याच्या कार्यकर्त्यांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे. लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री, ना. एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले .

निवेदन देताना व्हॉइस ऑफ मिडीयाचे वरोरा तालुका अध्यक्ष चेतन लुथडे , सचिव रवी खाडे, जिल्हा खजिनदार अनिल पाटील , प्रसिद्धी प्रमुख सारथी ठाकुर , हरिष केशवाणी , हितेश भालेराव सह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते .

error: Content is protected !!