महिला दिना निमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन

38

 शिवसेना (उबाठा) महिला आघाडीचे आयोजन 

वरोरा : महिलांनी आपल्या हक्कासाठी लढा देऊन त्यात यश मिळविले. त्यामुळे 8 मार्च हा जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीच्या जागतिक महिला दिनाचा उद्धेश हा महिलांना विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरित करणे व त्यांना प्रेरणा हा होता आणि या वर्षी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे  औचित्य साधत महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शिवसेना विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या पुढाकाराने दि.11 ला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

.      यावेळी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यात संगित खुर्ची, आहार प्रदर्शनी, कला प्रदर्शनी, पथनाट्य, प्रबोधनात्मक नृत्य आदी स्पर्धांचा सहभाग होता. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिस सुध्दा देण्यात आले. त्यात संगित खुर्ची स्पर्धेत वैशाली दरेकर यांनी प्रथम क्रमांक तर शारदा मातकर यांनी दुसरा क्रमांक मिळविला. आहार प्रदर्शनी स्पर्धेमध्ये भावना खोब्रागडे, हेमा पेटकर, माया सिडाम, शिला आगलावे, तेजस्विनी चंदनखेडे, लता दाते या महिलांनी भाग घेतला तर प्रबोधनात्मक नृत्य प्रकारामध्ये जागृती गुरनुले, मनिषा सावसाकडे, बिंदीया पुंजलवार, राणी बागेसर, सरला मालोकर, या महिलांनी सहभाग नोंदविला. त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसाचे वितरण करण्यात आले.

.      यावेळी सुषमा साबळे, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख, महिला आघाडी, नर्मदा बोरेकर, संघटीका, उज्वला नलगे, विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, सुषमा श्रीनिवास शिंदे, माजी नगरसेविका तथा सदस्या, वि.का.सह. संस्था भद्रावती, निलीमा शिंदे, प्रतिभा मांडवकर, जिल्हा युवती अधिकारी माया नारळे, उपसभापती, कृ.उ.बा.स.भद्रावती अश्लेषा जिवतोडे (भोयर), भावना खोब्रागडे, माला दासगुप्ता, गायत्री यमलावार,  शुभांगी अहिरकर, शिला आगलावे, वैशाली दरेकर, साक्षी कुंभलवार,  स्मिता ताटेवार, साक्षी वैद्य,  प्रमोद वाघ, अनिल सिंग, अभिजीत कुडे, रोशन भोयर, पवन महाडीक, तथा समस्त पदाधिकारी, महिला आघाडी, युवा-युवती सेना आणि महिला शिवसैनिक उपस्थित होते.