नागभीड : सामूहिक वनहक्क प्राप्त कोरंबी ग्रामसभेच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून वन वनवा प्रतिबंध अभियान राबविण्यात येते आहे. यावर्षी आज दिनांक २ मार्च रोजी या वन वनवा प्रतिबंध अभियान चा शुभारंभ करण्यात आला आहे.
या अभियान अंतर्गत दोन दिवस सलग फायर लाईन तयार करण्याचे काम करण्याचे काम करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती याप्रमाणे ९६ व्यक्ती संपूर्ण दिवसभराचे काम दोन दिवस श्रमदान म्हणून करतो आहे.
. पाहिल्याचे दिवशी २० ते २५ महिलांचा एक व पुरुषांचे दोन गटात विभागणी करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फायर लाईन तयार करणे, कचरा साफ करण्याची कामे केली आहे. आज किमान ६ किमी. फायर लाईन तयार करण्यात आली असून उद्या सुधा तेवढेच लोक श्रमदान करणार आहे. सामूहिक वनहक्क प्राप्त वनक्षेत्रात वनवा पासून जंगलाचा बचाव करणे, जंगलाचे व जैव विविधतेचे संरक्षण, सवर्धन करण्याचे हेतूने हे वन वणवा प्रतिबंध अभियान कोरम्बी ग्रामसभेच्या वतीने राबविण्यात येत आहे. यापुढे दररोज पाच व्यक्तीचे गस्ती पथक क्रमाक्रमाने गस्त करून वणवा प्रतिबंध करणार आहे. या विधायक कार्यासाठी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, रिवार्ड्स संस्था व वन विभागाचे मार्गदर्शन होत आहे. या वन वनवा अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण नागरिक अथक परिश्रम करीत आहेत.


