Home सामाजिक मांडवगु-हाड येथील महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

मांडवगु-हाड येथील महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

1172

वरोरा : महसूल विभागा मार्फत महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देशानुसार भटके व विमुक्त जातीतील लाभार्थी यांना शासन सेवा त्यांच्या गावात पुरविण्यासाठी वरोरा तालुक्यात मांडवगु-हाड येथे दि. 2 शनिवारी महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

.        या शिबिरात महसूल विभागाअंतर्गत येत असलेले विविध दाखले, आधारकार्ड दुरुस्ती, रेशन कार्ड विषयक कामे, निवडणूक मतदार जागृती व नोंदणी संजय गांधी विभाग योजना आदी विषय बाबत कामकाज करण्यात आले.

.        यावेळी ग्रामपंचायत बोरगाव शि. चे सरपंच संतराज नीळकंठ कुळसंगे यांनी शासन कामात विशेष सहभाग घेऊन शासन व नागरिक यांच्यातील दुवा बनण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. या अभियानाला नागरिकांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला.

error: Content is protected !!