Home सामाजिक राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांची शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाला भेट

राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांची शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाला भेट

1164

वरोरा : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड.संगीता चव्हाण या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना दि. 2 ला शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वरोरा येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

.       यावेळी त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देवुन चंद्रपूर जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेना महिला जिल्हा संघटीका गडचिरोली छाया कुंभारे, माजी जिल्हा प्रमुख चंद्रपूर निलीमा  शिंदे, चंद्रपूर जिल्हा संघटीका उज्वला नलगे यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.

.       यावेळी त्यांना मौजा बरांज मोकासा येथे कर्नाटक एम्टा कंपनी व केपीसिएल कंपनी नियमबाह्य व बेकायदेशिर कुठलाही ताबा न घेता अवैध उत्खनन करीत असल्यामुळे व गावकऱ्यांवर अन्याय अत्याचार करीत असल्यामुळे त्यांना न्याय व हक्क मिळण्याबाबत तसेच यासंबधाने बरांज मोकासा येथील महिलांचे सुरू असणारे उपोषणाबाबत माहिती देण्यात आली. त्यावर त्यांनी या संबंधाने संपुर्ण कागदपत्राची मागणी केली तसेच तेथील उपोषणग्रस्त महिलांना भेट देणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आपल्या मार्गदर्शपर भाषणात राज्य महिला आयोगाबाबत माहिती दिली तसेच महिलांचे सक्षमीकरण व महिलांकरीता महिला आयोग काय भुमिका बजावतो यासंबंधाने सांगितले व कोणतीही मदत लागल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.

.       यावेळी चंद्रपुर जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, उपतालुका प्रमुख अभिजीत पावडे, चंद्रपुर जिल्हा युवती सेना अधिकारी प्रतिभा मांडवकर, वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर, वरोरा शहर संघटीका शुभांगी अहिरकर, उपतालुका संघटीका स्मीता ताटेवार, उपशहर प्रमुख अनिल सिंग, विनोद खोब्रागडे,  दुर्गा खनके, मुक्ता हजारे, लता दाते, सुप्रभा मस्की, साक्षी दौलतकर व अनेक महिला व पुरूष पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!