Home सामाजिक रांगोळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण

रांगोळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण

1223

 सिंदेवाही तहसील कार्यालयाचे शिवजयंती निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन 

सिंदेवाही : देशात छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जल्लोष सुरू असून त्या निमित्ताने तहसिल कार्यालय सिंदेवाही यांचे वतीने विद्यार्थ्यांकरिता रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना नुकतेच तहसील कार्यालय येथे तहसीलदार संदीप पानमंद यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

.        छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वर्ग १ ते ५ आणि ६ ते १० अशा दोन गटातील विद्यार्थ्यांकरिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. यावेळी इयत्ता १ ली ते ५ वी या गटामध्ये प्रथम क्रमांक स्वरा धवणे, द्वितीय क्रमांक शर्वरी बिलकर, तृतीय क्रमांक ताशी पाटील आणि उत्तेजनार्थ क्रमांक सागर आसवानी याने पटकावला , तर वर्ग ६ ते १० या गटामध्ये प्रथम क्रमांक संयुक्तपणे हसरी बनसोड व मंदिरा माझी यांना , द्वितीय क्रमांक संयुक्तपणे अवनी वासेकर व सोनाक्षी खोब्रागडे यांनी, तर तृतीय क्रमांक संयुक्तपणे गायत्री कोलप्याकवार व श्रुती गोटेवार यांना देण्यात आला.तसेच उत्तेजनार्थ बक्षीस संयुक्तपणे संस्कृती गांडलेवार व अश्वधा येमुलवार यांना देण्यात आला.

.        यावेळी सर्व विजेत्यांना स्पर्धकांचे तहसीलदार संदीप पानमंद यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरव करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार मंगेश तुमराम, अव्वल कारकून जितेंद्र बोरकर महेश भैसारे, युवराज मेश्राम, प्रफुल रहाटे तसेच सर्व कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!