Home सामाजिक सिंदेवाहीत प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

सिंदेवाहीत प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

1205

◾ हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

सिंदेवाही : आपल्या देशापुढे सध्या अनेक संकटे उभी आहेत. देश एका वेगळ्या स्थितीतून जात आहे. यावर विचार मंथन करण्यासाठी आम्ही भारतीय लोक’, तालुका-सिंदेवाहीच्या वतीने २७ फेब्रुवारी मंगळवार ला सायंकाळी ६-३०वाजता, सोमेश्वर महाराज मंदिर जवळ,फटका ग्राऊंड, सिंदेवाही येथे राजकीय विश्लेषक तथा अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांचे ‘भारतीय लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

.       यामध्ये ते आपल्या देशासमोर उभी असलेली मोठी संकटे, देशातील राजकीय स्थिती काय आहे?, आपल्याला संविधान हवे की दुसरे काही? या सर्व बाबींवर ते भाष्य करणार आहेत. तरी परिसरातील सर्व स्री-पुरुष नागरिकांनी तथा युवक युवतींनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘आम्ही भारतीय लोक’ तालुका- सिंदेवाही, कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत लोधे यांनी केले आहे.

error: Content is protected !!