Home सामाजिक सम्यक विद्यार्थी आंदोलन कडून शिवजयंतीला खीरदान वाटप

सम्यक विद्यार्थी आंदोलन कडून शिवजयंतीला खीरदान वाटप

1244

सिंदेवाही : सध्या संपूर्ण भारतभर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असून नुकतीच वासेरा येथे जाणता राजा शिवजयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गाने भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा शाश्वत बुद्ध विहार परिसरात येताच त्याठिकाणी सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे वतीने खिरदान वाटप करण्यात आले.

.       वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर काम करीत असून आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काम करीत असून रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची १९४ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत असताना सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचेकडून मिरवणुकीतील शेकडो महिला पुरुषांना खिरदान वाटप करण्यात आले.

.        यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हा पदाधिकारी विल्सन कोवले, बुद्धीसागर कोवले, समाधान कोवले, अनुप कोवले, अजित खोब्रागडे, महेंद्र कोवले, संगीता वामन खोब्रागडे, प्रतिमा हेमंत सूर्यवंशी, लखन मेश्राम, तनिष्का सूर्यवंशी, तन्मय भगत, कविश कोवले, राहुल कोवले, हेमंत सूर्यवंशी, आयुष सूर्यवंशी, यांचेसह असंख्य विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!