Home सामाजिक शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरिबांना ‘आनंदाचा शिधा’

शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरिबांना ‘आनंदाचा शिधा’

1162

वरोरा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गोर गरीबांना आनंदाचा शिधा देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार वरोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आनंदाचा शिधा किट चे तहसील कार्यालय वरोरा च्या वतीने सोपविण्यात आला आहे.

.         छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधा वाटप सुरु झाले आहे. वरोरा तालुक्यातील अंतोदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत एकूण 33 हजार 892 शिधा पत्रिका नुसार शिधाजिन्नस संच नियतनाप्रमाणे प्राप्त झाले असून वरोरा तालुक्यातील सर्वच रेशन दुकानावर शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप सुरू केले आहे. शिधा मिळू लागल्याने यंदा गोरगरीब लाभार्थ्यांत समाधान आहे.

आनंदाच्या शिधा संचात 6 वस्तूंचा समावेश                                                                                                                                                                   सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रुपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे. प्रति शिधापत्रिका एक असे या संचाचे वाटप केले जात आहे. शिधापत्रिकाधारकांनी आनंदाचा शिधा संच घेऊन जावे असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे

error: Content is protected !!