आमदार प्रतिभा धानोरकर यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र
चंद्रपूर : कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या मद्रास-लखनऊ १६०९३/१६०९४, अंदमान एक्सप्रेस १६०३१/१६०३२ गाड्यांना स्टॉपेज वरोरा रेल्वे स्थानकावर अजूनही सुरु झालेला नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एका पत्रकाद्वारे केली आहे.
. या पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एम्टा, अरविंदो कोल माईन्स यांसारखे मोठे उद्योग आणि भव्य जैन मंदिर व प्राचीन वास्तू शिल्पे आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ट्रेनांचा स्टॉपेज वरोरा रेल्वे स्थानकावर अजूनही सुरु झालेला नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा रेल्वे स्थानकावर वरील रेल्वेगाड्यांचा स्टॉपेज सुरु करण्याची मागणी केली आहे.

