वरोरा : महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैधक शिक्षण मंडळ, मुंबई द्वारा मान्यताप्राप्त माता महाकाली कॉलेज ऑफ नर्सिंग, वरोरा येथे नुकताच जीएनएम प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा स्वागत व शपथग्रहण समारंभ पार पडला.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सचिन साधनकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे वैद्यकिय अधिक्षक डॉ. खुजे, माता महाकाली तंत्रनिकेतन वरोरा चे प्राचार्य प्रवीण बाभुळकर, माता महाकाली कॉलेज ऑफ फार्मसी विभागप्रमुख बावणे तसेच संस्थेच्या पल्लवी अमृतकर व शाम पिंपळे उपस्थित होते.
. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिस फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांना प्रा. प्रतीक नगराळे यांनी शपथ दिली. सदरील कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना डॉक्टर खुजे यांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व परिचारकांना वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व पटवून सांगितले. सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. शिल्पा कर्वे यांनी केले. सूत्रसंचालन आचल तुमराम व आभार प्रदर्शन प्रतीक्षा खोब्रागडे या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमास माता महाकाली ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटयूशनच्या सर्व कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते


