वरोरा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने स्वराज्य सप्ताह तथा स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन वरोरा येथील वणी बायपास मार्गावरील साईमंगल कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प माल्हार्पण व दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने करण्यात आले.
. या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, स्वागताध्यक्ष म्हणून विधानसभा अध्यक्ष वरोरा भद्रावती तथा चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती सदस्य विलास नेरकर, प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे, तालुकाध्यक्ष वरोरा रवींद्र भोयर, तालुकाध्यक्ष भद्रावती राजू बोरकर, शहराध्यक्ष वरोरा चंद्रकांत कुंभारे, गितेश सातपुते, दीपक तुरारे, महिला तालुकाध्यक्ष भद्रावती अर्चना आरेकर, उषा आखाडे, उमा नागपुरे तसेच कार्यक्रमाला मुख्य आकर्षण म्हणून दीक्षा गुरणुले शिवव्याख्याते पांढरकवडा जिल्हा यवतमाळ तसेच रूपाली पवार, चित्रपट फेम मुंबई या उपस्थित होते.
. आदिशक्ती निॠती ते सावित्रीबाई फुले पर्यंत अनेक महापराक्रमी स्ञियांनी ईतिहास घडविला, शेतीचा शोध लावून मानवी जीवनाला स्थिरता प्रदान केली शिवराज्याची निर्मिती करून जिजाऊ माॅ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लोककल्याणकारी राजा म्हणून जगापुढे आदर्श निर्माण केला. आजही प्रत्येक घरात जिजाऊ आहे परंतु तिला इतिहास घडविण्यासाठी संधी सातत्याने नाकारण्यात आली. या स्वराज्य सप्ताह तथा स्नेहमिलन सोहळ्यातून सर्व प्रकारच्या अज्ञानाच्या शृंखला तोडून विकासाचा शाश्वत मार्ग निर्माण व्हावा या मातृसत्ताक स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी शिवरायांचा इतिहास आणि सध्याच्या परिस्थितीतील राज्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष राजू बोरकर यांनी केले.


