किशोर डुकरे यांच्या आंदोलनाचे फलित
वरोरा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी वरोरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण उभारले होते. उपोषणा च्या पाचव्या दिवशी चार मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यातील पीक विमा च्या मागणी ची दखल कृषी विभाग व विमा कंपनीने घेत शनिवारी वरोरा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये यादया प्रसिद्ध करण्यात आल्या. किशोर डुकरे यांच्या आंदोलनाचं फलित झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यात उमटू लागल्या.
. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम, सन २०२३ अंतर्गत हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान अंतर्गत, नुकसान भरपाई मिळणेबाबत आर्दाशत केलेली अधिसुचना क्र. जिअकृअ/सांख्यिकी/प्रपिवियो/पिकद/४०१९/२०२३ दिनांक २०.०९.२०२३ अन्वये मे. ओरिएंटल इन्सुरन्स कंपनी यांनी सोयाबित पिकाचे झालेल्या नुकसानीचा २५ टक्के पिकविमा मंजुर करुन शेतकन्यांच्या आधार लिंक बैंक खात्यात जमा केलेला आहे. मे. ओरिएंटल इन्सुरन्स कंपनी कडुन प्राप्त झालेली यादी प्रत्येक ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात येत आहे.तरी यादीत असलेल्या शेतकऱ्यांनी यादीत दर्शविलेल्या बैंक खात्यात पिकविमा रक्कम जमा झाली किंवा नाही, याची शहानिशा करावी.
. ज्या शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पिक विमा रक्कम जमा झाली नसल्यास त्यांनी त्याबाबत चा तक्रार अर्ज संबंधीत कृषि सहाय्यक किंवा तालुका कृषि अधिकारी, वरोरा कार्यालयात जमा करावा. तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये सोयाबिन पिकाचा पिकविमा काढला परंतु प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव आलेले नाही त्या शेतकऱ्यांनी पिक विमा पावतीसह तक्रार अर्ज तालुका कृषि अधिकारी, वरोरा कार्यालयात जमा करावा. अशी सूचना या नोटीस द्वारे तालका कृषि अधिकारी, वरोरा यांनी केली आहे.


