नागभीड : शिवराय ग्रुप नवेगाव हूंडेश्वरी यांचे वती (ने दि. १९ ) शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम व प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यास्तव ऐतिहासिक शिवाजी महाराजांच्या जीवनावरील माहिती ज्ञात करून त्यांची बुद्धिमत्ता विकसित करण्याकरिता शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिवराय ग्रुप द्वारा सुरू आहे.
. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन दि. १४ फेब्रुवारी पासून प्राथमिक व माध्यमिक गटात करण्यात आले आहे. विविध शाळातून या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना क्रमानुरूप प्रमाणपत्र व बक्षीस वितरण शिवजयंतीला करण्यात येणार आहे.
. सदर स्पर्धा घेण्यासाठी शिवराय ग्रुपचे सर्व कार्यकर्ते सचिन सोनुले, शरद पांडव, गणेश सोनुले, रत्नदीप गुरनुले, विशाल सोनुले, संतोष सिडाम, मोरेश्वर नेवारे, रेश्मिता गुरनुले,करिष्मा चौधरी आणि समस्त शिवराय ग्रुप नवेगाव हुंडेश्वरी तथा शाळेतील शिक्षक संजय येरणे, मुख्याध्यापक मेश्राम, अन्य शिक्षक वृंद यांनीही सहकार्य केले. स्पर्धेच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना शिवचरित्राची माहिती मिळवण्यास प्रेरणा मिळाली. यामुळे ग्रामीण भागात सुंदर स्पर्धा आयोजनाबाबत शिवराय ग्रुप नवेगाव हूंडेश्वरीचे अभिनंदन करण्यात येत आहे.


