नेरी : चिमूर तालुक्यातील शिवनपायली येथे भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धाचे उदघाटन आमदार बंटी भांगडीया यांचे प्रतिनिधी भाजपा महामंत्री विलास कोराम व भाजपा जेष्ठ नेते रामेश कंचर्लावार यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष म्हणून चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश घारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय चौरे चिमूर, राजू भानारकर सरपंच सिरपूर, कणीलाल पा नाकाडे, महेंद्र डेकाटे, पोलीस पाटील,लता काळसरपे ग्रा प सदस्य मान्यवर उपस्थित होते.
. राष्ट्रसंताच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली पाहुण्यांचे स्वागत सत्कार करुन उपस्थित खेळाळू व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले यात कबड्डी खेळविषयी आणि खेळ हे खेळीमेळीने खेळावे यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला या स्पर्धेत अनेक संघांनी भाग घेतला. आ बंटी भांगडीया यांच्या कडुन या स्पर्धेला आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आले आहेत या कार्यक्रमाचे संचालन जीवन पा बोरकर तर आभार संजय नागोसे शिवनपायली यांनी मानले.


