चंद्रपुर : प्रचंड मोठ्या आवाजात डरकाळ्या फोडत ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बेलारा बफर झोनमध्ये दोन वाघांमध्ये झुंज झाली आणि ते दोन्ही वाघ एकमेकांच्या अंगावर तुटून पडले. बराच वेळ त्यांच्यात तुंबळ युद्ध सुरू होते, जे पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवले.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प राज्यात नव्हे जगात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून पर्यटक वाघ पाहण्यासाठी ताडोबात दाखल होतात. विदेशातून आलेल्या पर्यटकांना ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बेलारा बफर झोनमध्ये दोन वाघांची झुंज पाहायला मिळाली. आणि ती झुंज त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.


