आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन
वरोरा : गुरुदेव सेवा मंडळ आसाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५५ वी पुण्यतिथी महोत्सव आसाळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली असुन शुक्रवारी आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
. या शिबिरामध्ये 25 नागरिकांची मोतीबिंदू तपासणी, 110 नागरिकांचे आयुष्यमान कार्ड, तसेच शेकडो नागरिकांचे बीपी, शुगर, सिकलसेल यासारख्या इतर आजाराची तपासणी करण्यात आली. नागपूर येथील अमन ब्लड बँक मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती राजू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराव बोन्डे तर प्रमुख पाहूणे म्हणून विदर्भवादी शेतकरी नेते वामनराव चटप, चंद्रकांत दुभे, आशिष जांभुळे, किशोर डुकरे, राजू आसुटकर, गट ग्रामपंचायत चे उपसरपंच मारोती जांभुळे तसेच ग्रामपंचायत सदस्य गण गावकरी उपस्थित होते.


