Home सामाजिक गुंफा गोंदेडा यात्रेमुळे चिमूर आगराला एकात्तर हजाराचे उत्पन्न

गुंफा गोंदेडा यात्रेमुळे चिमूर आगराला एकात्तर हजाराचे उत्पन्न

1380

८ बसेसच्या ७० फेऱ्या

 नेरी : चिमूर तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमितील गुंफा गोंदेडा यात्रा दि 21 ते 25 जानेवारी दरम्यान मोठया उत्साहात पार पडली या यात्रेला वंदनीय राष्ट्रसंताचे दर्शन घेण्यासाठी व तपोभूमीला अभिवादन करण्यासाठी हजारो गुरुदेव भक्त भाविकांनी भेट दिली यासाठी चिमूर बस आगारांनी 8 बसेस ची व्यवस्था केली होती या संपुर्ण यात्रेच्या कालावधीत 70 फेऱ्या मारण्यात येऊन 1470 किलोमीटर चा प्रवासाचा टप्पा पूर्ण करीत आगाराला एकात्तर हजार पाचशे रुपयांचा उत्पन्न मिळाले.

.          गुरुदेव भक्त भाविक व प्रवाश्यानी जादा वाहनांची बसेची सुविधा घेऊन चिमूर ते गोंदेडा यात्रेत सहभाग घेतला गोंदेडा येथे बसस्थानकासाठी पेंडाल टाकण्यात आला होता यासाठी गुंफा समितीचे सद्स पांडुरंग अडसोळे मोटेगाव यांनी मोलाचे योगदान दिले या यात्रेच्या उत्पादन च्या यशाकरिता आगार व्यवस्थापक संभाजी शिंदे यानी मार्गदर्शन केले तसेच आगारातील सूरज मुन वाहक निरीक्षक वैभव धाडसे सहनिरीक्षक झाडे लिपिक बालाजी अदमाने वाहतूक निरीक्षक रिधेश्वर धांडे, सिडाम बाबू, सुरेश ननावरे यांनी महत्त्वाचे योगदान दिले तसेच सर्व चालक वाहक यांनी सुद्धा यात्रा सुयश करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

error: Content is protected !!