१० फूट बाहुबली हनुमान

44

वरोरा : कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने वरोरा शहरात फनफेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दिल्ली येथील प्रसिद्ध दहा फूट उंचीचे बाहुबली हनुमान यांची मिरवणूक दुपारी 3 वाजता वरोरा शहरातील गांधी चौकातून काढण्यात आली. या १० फुटी बाहुबली हनुमान पाहण्यासाठी वरोराकरानी चांगलीच गर्दी केली होती.

(छायाचित्र : लखन केशवानी, वरोरा)