Home सामाजिक गणराज्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गणराज्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

1377

भद्रावती : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंदोरी येथे गणराज्य दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नंदोरी येथील पल्लवी एकनाथ जीवतोडेही गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात प्रथम आली. तिचा ग्राम पंचायत नंदोरी च्या वतीने सत्कार करण्यात आला.

.         यावेळी सरपंच मंगेश भोयर, उपसरपंच उषा लांबट, अजित पुसनाके, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे, गोपालकृष्ण मांडवकर, धनराज विरुटकर, भानुदास ढवस, विनोद लांबट, रमेश तिखट, विदर्भ कोंकण ग्रामीण बँकच्या कॅशियर स्नेहा आगलावे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम ढवस, मुख्याध्यापक राजगिरे, शिक्षक वृंद सह मोठ्या प्रमाणात गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!