Home सामाजिक मनसे नेत्या शर्मिला राज ठाकरे यांचे वरोरा नगरीत आज होणार आगमन

मनसे नेत्या शर्मिला राज ठाकरे यांचे वरोरा नगरीत आज होणार आगमन

1386

वरोरा आनंदवन चौकात मनसे पदाधिकारी करणार स्वागत

जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते राहणार उपस्थित

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी तथा मनसे नेत्या शर्मिला ठाकरे, मनसे महिला सेना राज्य उपाध्यक्षा रिटा गुप्ता या वणी येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या “शिव महापुराण कथा”सप्ताह कार्यक्रमात सहभागी होणार असून आज दिनांक 1 फेब्रुवारी ला दुपारी 12 च्या दरम्यान वरोरा येथील आनंदवन चौकात मनसे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे जंगी स्वागत करणार आहे. वणी येथे मनसे नेते राजू उंबरकर यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांची शिव महापुराण सप्ताह कार्यक्रमात हजेरी लक्षवेधक राहणार आहे.

.          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरोरा विधानसभा क्षेत्रात संघटन बांधणी चांगली असल्याने त्यात पुन्हा भर पडावी या उद्देशाने मनसेचे पदाधिकारी उद्या वरोरा येथील आनंदवन चौकात भव्य स्वागत करणार आहे. विशेष म्हणजे या स्वागत कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार असून जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या स्वागत कार्यक्रमाला उपास्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, महिला सेना तालुका अध्यक्षा रेवती इंगोले, विशाल देठे, राम पाचभाई, मोहित हिवरकर, प्रशान्त बदकी, प्रतीक मुडे. राजेंद्र धाबेकर गजू वादाफळे, पवन ढोके, दिलीप उमाटे, संदीप मोरे, धनराज बाटबरवे, किशोर धोटे, संदीप धानोरकर इत्यादीनी केले आहे.

error: Content is protected !!