नागभीड येथील ठाणेदार विजय राठोड यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत

45

नागभीड : नागभीड पोलीस स्टेशन चा पदभार पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी नुकताच स्विकारला. नागभीड शहर शांतिप्रिय राहावे अशी आशा बाळगत नव्याने रुजू झालेले ठाणेदार राठोड यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.

.          यावेळी नागभीड शहर तसेच तालुक्याविषयी ठाणेदार राठोड यांच्याशी चर्चा करण्यात आली, शिवसेनेतर्फे नेहमीच प्रशासनाला सहकार्य होत आलेले आहे. आणि यापुढेही सहकार्य राहील याची हमी नागभीड शिवसेना प्रमुख मनोज लडके यांनी पो. नि.राठोड यांना दिली. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मनोज लडके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी श्रीकांत पिसे शहर प्रमुख, गिरीश नवघडे तालुका संघटक, चंदन खापर्डे शाखा प्रमुख, आणि शरद सहारे शाखा प्रमुख हे उपस्थित होते.