Home सामाजिक वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आयपीएस नयोमी साटम यांनी पदभार स्वीकारला

वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आयपीएस नयोमी साटम यांनी पदभार स्वीकारला

1476

चंद्रपुर 

.         वरोरा भद्रावती परिसरातील अवैध धंदेवाले व गुंडांचा पर्दाफाश करणारे आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी यांची जालना येथे बदली झाल्यानंतर येथे कोणता पोलीस अधिकारी येणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले होते, १ जानेवारी पासून वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आयपीएस नयोमी साटम यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी १९ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत मंगळवेढा येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले.

.         आयपीएस नयोमी साटम या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रहिवासी असून सध्या मुंबईत स्थायिक आहेत.  वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांना मिळालेली जबाबदारी आव्हानात्मक आहे हे खरे असले तरी त्यांनी आपल्या कर्तव्याचा व अधिकाराचा योग्य वापर करून गुन्हेगारांवर कायद्याची योग्य अंमलबजावणी केली तर सर्वसामान्यांना नक्कीच न्याय मिळेल अशी आशा आहे. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक, अवैध गौण खनिज उत्खनन, सट्टा पट्टी, अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे आवाहन ते कसे पेलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!