कान्सा (सि) येथे भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर 

25

भद्रावती

.            तालुक्यातील कान्सा ( सि.) येथे श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांतर्गत 26 डिसेंबर श्रध्देय बाबा आमटे यांच्या जयंती निमित्त दि. २९ डिसेंबर रोज शुक्रवार रोजी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत या कालावधीत गावातील ग्रा.पं. पटांगणावर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुदेव सेवा मंडळ कान्सा (सि.) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

.            स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट जनसामान्याच्या भल्याकरीता विविध उपक्रम तसेच अभियान राबवित आहे. यातील एक उपक्रम श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत रोग निदान शिबीराचे आयोजन करीत असते.  समाजातील सर्व घटकांनाकरीता, गरीब व गरजू जनतेचे आरोग्य अबाधीत ठेवण्याकरीता निशुल्क शिबीरे आयोजित करण्यात येत असते.

.            स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून भद्रावती तालुक्यातील कान्सा येथे 29 डिसेंबरला आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या शिबिरात गरीब व गरजू रुग्णांचा मोफत उपचार करण्यात येईल. याप्रसंगी मेडिसीन, द्ददयरोग, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थीरोग, त्वचारोग, कान नाक व घसा रोग, श्वसन, मानसिक रोग विषयक तज्ज्ञ डॉक्टर मंडळी रुग्णांचे निदान व उपचार करतील.

.            भरती रुग्णांना हॉस्पीटलमध्ये जाण्याकरीता वाहनांची व्यवस्था मोफत राहील. शिबिरामध्ये येतांना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे. भद्रावती तालुक्यातील जनतेनी या रोगनिदान व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे संयुक्त आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष धनराज पा. आस्वले, ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, भद्रावती कृ.उ.बा. समिती सभापती भास्कर ताजणे, नंदोरी ग्रा.प. सरपंच मंगेश भोयर, ट्रस्टचे कार्यवाहक वर्षा कुरेकार व अनुप कुटेमाटे, सचिव संजय तोगट्टीवार, कान्सा (सि.) ग्रा. प. सरपंच मयुर टोंग,  तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ कान्सा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे